‘मोगॅम्बो खुश हुवा..’ हा संवाद कित्येक घरांमधून अबालवृद्धांना तोंडपाठ आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून अक्षरश: राज्य करणाऱ्या अमरीश पुरी यांच्या तोंडी असलेला ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील संवाद वर्षांनुवर्ष लोकांच्या मनात गारुड करून आहे. हिंदी चित्रपटांमध्ये नेहमीच नायक-नायिका आणि खलनायक हे तीन महत्त्वाचे घटक राहिले आहेत. यातला एकही जण नसेल तर तो चित्रपटच बेचव ठरेल, म्हणायचा. अगदी बडजात्यांच्या गोड गोड कौंटुबिक चित्रपटातही चक्क आईलाच खलनायकी वर्तन करायला लावून नाटय़ निर्माण करावे लागले होते. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने ‘व्हिलन्स वुई लव्ह’ या विषयावर कमलेश पुरी यांनी गप्पा मारल्या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंदी चित्रपटांमधून खलनायक म्हणूनही आपला ठसा उमटवणारे अमरीश पुरी, त्यांचे दोन्ही मोठे बंधू मदन पुरी आणि चमन पुरी यांच्या भारतीय चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका या स्मरणीय आहेत. त्यासंबंधीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पुरी कुटुंबीय आणि ‘मुंबई प्रेस क्लब’ यांनी ‘व्हिलन्स वुई लव्ह’ या गप्पाष्टकाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पुरी कुटुंबातील सगळ्यात मोठे बंधू मदन पुरी यांच्याविषयी त्यांचे सुपुत्र कमलेश पुरी यांनी लिहिलेल्या ‘माय फादर द विलन’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आपल्या घराण्यातील या तिन्ही खलनायकांच्या आपले वडील, काका अमरीश आणि चमन पुरी यांच्याबद्दलच्या आठवणींना कमलेश यांनी उजाळा दिला.

‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण?, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार? या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली, असे कमलेश यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने आपल्या वडिलांना खच्चून प्रसिद्धी मिळाली, असं त्यांनी सांगितलं. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या. त्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूचना मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है?’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले.

अमरीश काका हे तर फारच शिस्तप्रिय होते, असे ते म्हणतात. १९५२ साली मुंबईत आल्यानंतर अमरीश पुरी यांनी सरकारी नोकरी केली होती, असे कमलेश पुरी यांनी सांगितले खरे, पण तरी त्यावर भल्याभल्यांचा विश्वास बसणे कठीण. इतकी त्यांची खलनायकी प्रतिमा लोकांच्या मनात घट्ट रुजली आहे. सरकारी नोकरी केल्यानंतर मग काही काळाने त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. साहजिकच थोरले बंधू मदन हे खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध असल्याने त्यांच्याही वाटय़ाला खलनायकी भूमिकाच आल्या पण, अमरीश काकांनी त्या वेगळ्या पद्धतीने वठवल्या म्हणून त्या आजही लोकांच्या आठवणीत आहेत, असे पुरी यांनी सांगितले. त्यांचा ‘मिस्टर मोगॅम्बो’ हा तर खलनायकांचा नायक आहे, अशा शब्दांत कमलेश यांनी आपल्या काकांचा गौरव केला. शिवाय अमरीशजी आपल्या वडिलांचा फार आदर करत असत, अशी आठवणही त्यांनी सांगितली. नेहमी चित्रीकरणाला निघण्यापूर्वी अमरीश पुरी आपल्या दोन्ही वडील बंधूंच्या चमन आणि मदन यांच्या पाया पडत असत हेही कमलेश पुरी यांनी आवर्जून नमूद करत त्यांच्या पडद्यावरच्या खलनायकी प्रतिमा आणि वास्तव स्वभाव यातला फरक पहिल्यांदाच उलगडून सांगितला.