‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात कधी हवालदार म्हणून, तर कधी लहान मुलगा म्हणून अभिनेता विनीत भोंडे झळकला. ‘मूर्ती लहान पण किर्ती लहान’ अशी ओळख असणारा विनीत त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसला. तिथे त्याने कॅप्टन्सची पहिला मान मिळवला. बिग बॉस नंतर आता तो काय करतोय, हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आता चाहत्यांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिनेता विनीत भोंडे आगामी ‘कळस’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात १९८३ ते १९८५ या काळातली गोष्ट दाखवण्यात येणार असून विनीत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच विनीतने या चित्रपटाचे संपूर्ण कथानक वाचले असून त्याला होकार दिला आहे. यामध्ये तो ‘धर्मा’ या महत्वपूर्ण भूमिकेत आहे. याबाबत विनीत म्हणतो, ‘मी चांगल्या सिनेमाच्या शोधात होतो. त्यावेळी या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे व कॅमेरामन योगेश अंधारे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी ‘कळस’ या सिनेमाची गोष्ट मला ऐकवली. ती गोष्ट ऐकून मी काही काळ थक्क झालो. हा सिनेमा माझ्यासाठीच आहे असे मला वाटले. मी या सिनेमातील माझ्या पात्राच्या प्रेमात पडलो आणि या भूमिकेसाठी लगेचच तयारी सुरु केली.’

Photo : रणवीर- आलियाच्या ‘गली बॉय’चा फर्स्ट लूक पोस्टर

अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. ‘कळस’ या सिनेमाचे दिग्दर्शन रोहन सातघरे करत असून लेखन आशिष निनगुरकर यांचे आहे. लवकरच या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.