बी- टाऊनमध्ये सध्या चर्चेत असलेल्या कलाकारांच्या नव्या पिढीमध्ये सैफचा मुलगा इब्राहिम, शाहरुखचा मुलगा आर्यन यांची एकीकडे जोरदार चर्चा असतानाच आता स्टार किड्सच्या यादीत आणखी एक नाव चर्चेत आलंय. अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन मेहरा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहन मेहरा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वीच एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आलाय. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सिक्वलमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज असलेली अभिनेत्री तारा सुतरियासोबत रोहनच्या अफेअरची चर्चा आहे. २०१५ मध्ये एका पार्टीमध्ये या दोघांची भेट झाली. या ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. रोहनच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही ताराची हजेरी असते. गेल्या वर्षी त्याच्या कुटुंबियांसोबतच ताराने दिवाळी साजरी केली होती. इतकंच नाही तर ताराच्या २१व्या वाढदिवशी एक पब बूक करून तिला त्याने सरप्राइज दिलं होतं. त्यानंतर लंडनमध्ये दोघांनी एकत्र सुट्ट्यांचा आनंदही घेतला.

वाचा : प्रभासच्या लग्नाविषयी त्याची बहिण म्हणते…

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील पदार्पणामुळेच तारा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. तर रोहनदेखील सैफ अली खानच्या आगामी ‘बाजार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या पदार्पणाची चर्चा जरी अधिक नसली तरी त्याच्या या अफेअरने मात्र सध्या सर्वांचंच लक्ष वेधलंय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod mehra son rohan mehra dating actress tara sutaria