प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या निधनानंतर ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विनोद मेहरा हे ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. अभिनयासोबतच अभिनेत्री रेखासोबतच्या नात्यामुळे ते नेहमीच सिनेसृष्टीत चर्चेत असायचे. दरम्यान नुकतंच पुन्हा एकदा रेखा आणि विनोद मेहरा चर्चेत आले आहेत. विनोद मेहरा यांची पत्नी किरण मेहरा यांनी त्या दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण मेहरा यांनी ET टाईम्सला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीदरम्यान त्यांनी विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केले. यावेळी त्या म्हणाल्या,” रेखा यांनी विनोद यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ दिली. ती एक निस्वार्थ, प्रेमळ आणि क्षमाशील स्त्री आहे. रेखा या आमच्या लग्नालाही उपस्थित होत्या. रेखा ही एक अद्भुत व्यक्ती आहे. तिने शेवटच्या श्वासापर्यंत विनोदला साथ दिली. आज जर ती त्याला भेटली तर त्याला मिठी मारेल.”

महिनाभरानतंर शाहरुखच्या लेकीने पोस्ट केला फोटो, म्हणाली “डू नॉट…”

रेखा यांचे चरित्र लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक यासिर उस्मान यांनीही त्यांच्या पुस्तकात या दोघांमधील नात्याबद्दल लिहिले आहे. यात त्या दोघांचा एक किस्सा सांगितला आहे. एकदा विनोद हा रेखाला घरी घेऊन गेला होता. तेव्हा त्याची आई खूप रागावली होती. त्या रेखाला आपली सून करुन घेण्यास अजिबात इच्छुक नव्हत्या. विनोद मेहराची आई रेखाचा इतका तिरस्कार करत होती की, जेव्हा ती त्यांच्या पाया पडण्यासाठी गेली तेव्हा त्यांनी तिला दूर ढकलले होते.

“सापाने त्याचे काम बरोबर केले पण…”, बॉलिवूड अभिनेत्याचा सलमान खानवर अप्रत्यक्ष निशाणा

यानंतर विनोद मेहरा यांचे मीना ब्रोकासोबत लग्न ठरले होते. मात्र विनोद मेहरा हे बिंदिया गोस्वामीच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांचे लग्न तुटले. मात्र, काही कारणास्तव त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि नंतर १९८८ मध्ये त्यांनी किरण मेहरासोबत लग्न केले. पण किरणसोबतचे त्यांचे लग्नही केवळ दोन वर्षे टिकले कारण विनोद यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ऑक्टोबर १९९० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना सोनिया आणि रोहन मेहरा अशी दोन मुले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod mehra wife kiran mehra says rekha remained in his life till the end calls her wonderful person nrp