विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणार अभिनेता वीर दास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बंगळुरूमधील मल्लमेश्वरम येथील चौडिया मेमोरियल हॉलमध्ये वीर दासचा कार्यक्रम होणार होता मात्र उजव्या विचारसरणीच्या काही संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. वीर दासने आपल्या ट्वीटवर अकाऊंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याने प्रेक्षकांना काही प्रश्न विचारले आहेत त्यावर प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे.

वीर दासने ट्वीटमध्ये आपल्या प्रेक्षकांना विचारले “आज आपण कोणत्या धर्मावर टीका केली का?” प्रेक्षक म्हणाले “नाही” त्याने पुढे विचारले “यातील कोणीच अतिरेकी नाही?”, प्रेक्षकांनी “नाही” हे उत्तर दिले, तो पुढे म्हणाला, “यातील कोणीच पाकिस्तानी एजेंट नाही?” प्रेक्षक म्हणाले “नाही”. असे काही त्याने प्रश्न विचारले. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने स्पष्टीकरण दिले आहे की ‘हा व्हिडीओ मी एका कार्यक्रमानंतर बनवला आहे माहितीसाठी, माध्यमातील बातम्यांमध्ये मला जाण्याची इच्छा नाही. मी एक कलाकार आहे मला बातम्यांमध्ये राहायचे नाही, माझ्या कन्टेन्टवर अनेक अनुमान बनवले जात आहेत मात्र माझा माझ्या कलेवर विश्वास आहे आणि प्रेक्षक हाच माझा आवाज आहेत.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

Photos: डेटिंगच्या अफवा, लग्न अन् ६ वर्षांनी झाले पालक; बिपाशा-करणची लव्हस्टोरी आहे खूपच इंटरेस्टिंग

वीर दासचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अनेक कॉमेडी शो मध्ये त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत येतो.अभिनेता वीर दासने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. प्रामुख्याने तो विनोदी भूमिका साकारताना दिसला आहे.

दरम्यान वीर दासने अमेरिकेत एका कार्यक्रमात असं म्हणाला होता “मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो”. त्याच्या या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनी केस दाखल केली होती

Story img Loader