बॉलिवूड अभिनेता आणि विनोदवीर वीर दास हा त्याच्या खास विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. वीर दासचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अनेक कॉमेडी शो मध्ये त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतंच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने देशातील कायदेशीर कारवाईची खिल्ली उडवली आहे.
वीर दास याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ एका कॉमेडी शो मधील आहे. यात त्याने भारतात भावना भडकवल्याच्या नावाखाली कोणालाही शिक्षा केली जाऊ शकते याबद्दल भाष्य केले आहे. तसेच त्याने भारतातील कायदेशीर कारवाईची खिल्लीही उडवली आहे.
“जर तुम्हाला ते विचित्र वाटत असेल तर…”, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वीर दासचे स्पष्टीकरण
या व्हिडीओत वीर दास म्हणाला, देशात कोणत्याही कॉमेडियनला कधीही कानशिलात लगावली जाऊ शकते आणि आम्ही याबाबत कोणी मारले हे न विचारता त्याला का मारले असे विचारतो. याचे उत्तर म्हणजे कोणालाही देशद्रोह, बदनामी आणि भावना दुखावल्याच्या आरोपाखाली कानशिलात लगावली जाऊ शकते, असे त्याने म्हटले.
वीर दासचा हा नवा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या नवीन व्हिडीओला ६ हजारांहून अधिक लाईक्स आणि ५० हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. दरम्यान वीर दासने यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. वीर दासच्या या संपूर्ण व्हिडीओची एक छोटी क्लिप ट्विटरवर शेअर करून लोकांनी त्याला चांगलेच सुनावले होते. मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो, असेही तो म्हणाला होता.
‘रात्री दोन वाजता एटीएम बाहेर…’, वीर दासने सांगितला भयानक अनुभव
“मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आमचा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्यांवर धावून जातो,” असे व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये त्याने म्हटले होते.