बॉलिवूड अभिनेता, विनोदवीर वीर दास हा त्याच्या खास विनोदी शैलीमुळे ओळखला जातो. वीर दासचे विनोद हे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. अनेक कॉमेडी शो मध्ये त्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत येतो. नुकतंच बेंगळुरू येथे त्याच्या कार्यक्रमाविरोधात हिंदू जनजागृती समितीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री मोहन गौडा आणि श्री राम सेना बंगळुरूचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी वीर दासचा होणार कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. बेंगळुरू येथील व्यालीकवल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वीर दासवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आणि देशाची चुकीची प्रतिमा जगभरात दाखवल्याचा आरोप आहे.
चाहत्यांच्या गर्दीतून दिशाला सुखरूप नेणारी व्यक्ती आहे तरी कोण? नेटकरी म्हणाले “हा तर…”
तक्रार दाखलकर्त्यांनी असं म्हंटल आहे की ‘अशा वादग्रस्त व्यक्तीला बेंगळुरूसारख्या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागात विनोदी कार्यक्रम करण्यास परवानगी देऊ नये. वीर दासला बंगळुरूमध्ये शो करण्याची परवानगी मिळाली तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. म्हणूनच त्याच्या कार्यक्रमाला परवानगी मिळू नये.’
वीर दासचे अमेरिकेत एका कार्यक्रमात असं म्हणाला होता “मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो”. त्याच्या या वक्तव्यावर मुंबई पोलिसांनी केस दाखल केली होती. अभिनेता वीर दासने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. प्रामुख्याने तो विनोदी भूमिका साकारताना दिसला आहे.