छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. विराजस कुलकर्णी हा नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. विराजसने अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लगीनगाठ बांधली आहे. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर त्या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर त्यांचे बरेच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. आता लग्न झाल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीने विराजससाठी एक सल्ला दिला आहे.

विराजने रोहित शेट्टीचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओत रोहित आणि विराजसची आई आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. यावेळी रोहित बोलतो की “विराजस मी ऐकलं की तुझं लग्न होणार आहे. लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि लग्न झालं तरी सगळ्यात जास्त प्रेम हे आईला करायचं.”

Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
a newlywed bride said a beautiful ukhana for husband
Ukhana Video : “रुख्मिणीचा कृष्ण, सीतेचा राम…” नवरीने घेतला सुंदर उखाणा, VIDEO एकदा पाहाच
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
pune fc road video : a puneri boy amazing suggestion to youngsters
Video : “मित्रा, यावर्षी तरी तिच्या इच्छा पूर्ण करण्याऐवजी …” पुणेकर तरुणाने दिला लाखमोलाचा संदेश, पुणेरी पाटी होतेय व्हायरल
Groom bride dance video in there wedding on marathi song video goes viral
VIDEO: “आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं” नवरीनं लग्नात केला भन्नाट डान्स; पाहून नवरदेवही झाला लाजून लाल

आणखी वाचा : राज ठाकरेंच्या नातवाचे झाले नामकरण, नावाचा अर्थ माहितीये का?

आणखी वाचा : “हो मी व्हर्जिन…”, सलमान खानच्या उत्तराने चाहत्यांना बसला होता आश्चर्याचा धक्का

रोहित शेट्टीचा हा व्हिडीओ शेअर करत विराजस म्हणाला, “UPG आणि Whistling Woods मध्ये शिकत असताना रोहित शेट्टी ह्यांच्या गेस्ट लेक्चरला बसण्याची संधी अनेकदा मिळाली आणि इतक्या अभ्यासपूर्ण, प्रामाणिकपणे, आणि मनापासून मारलेल्या गप्पा ऐकून तृप्त झालो होतो… आता इतक्या वर्षांनी पुन्हा त्यांच्या खास शैलीमध्ये महत्त्वाचा हा गमतीशीर सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद!”

आणखी वाचा : “मी एका कपलसोबत ‘Throuple Relationship’मध्ये होते”; सायशा शिंदेने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : महिन्याला लाखो रुपये कमवणाऱ्या ‘या’ फेमस Youtubers चे शिक्षण किती आहे माहित आहे का?

दरम्यान विराजस आणि शिवानी गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला होता. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपासून व्हायरल होत होती. विराजस कुलकर्णीने माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे. तर शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी शेवटी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत दिसली होती.

Story img Loader