छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांच्या लग्नाची चर्चा सिनेसृष्टीत रंगली आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर ते दोघंजण कधी लग्न करणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. त्यानंतर आता त्या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवानी रांगोळेने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शिवानी आणि विराजस हे दोघेही नववधू आणि वराच्या पोशाखात दिसत आहे. त्यांच्या डोक्यावर मुंडावळ्याही बांधल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी विराजस हा शिवानीच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे.
VIDEO: क्रिस रॉकने ६ वर्षांपूर्वी ऑस्करदरम्यान उडवली होती विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली, म्हणाला “जॅडा ही…”
तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अवघ्या काही क्षणात तो व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. या दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.
दरम्यान विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी लग्न केलेले नाही. या व्हिडीओमागचे सत्य नुकतंच समोर आले आहे. त्यांचा हा व्हिडीओ एका जाहिरात शूटच्या दरम्यानचा आहे. त्या दोघांनी एका ज्वेलरी ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी शूट केले आहे.
“जावळीच्या जंगलाचा राजा एकच…”, अंगावर शहारा आणणारं ‘शेर शिवराज’चे नवं पोस्टर पाहिलंत का?
विराजस कुलकर्णीने माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे. तर शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी शेवटी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत दिसली होती.