अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्या लग्नाला काही दिवसांपूर्वी एक महिना पूर्ण झाला. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर ३ मे २०२२ रोजी विराजस-शिवानी विवाहबंधनात अडकले. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर विराजस-शिवानीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नुकतंच विराजसने त्यांच्या लग्नादरम्यान झालेला मजेशीर किस्सा सांगितला आहे.

विराजस आणि शिवानी ही जोडी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. त्या दोघांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला होता. त्यावेळी दोघांनीही दाक्षिणात्य पद्धतीची वेशभूषा केली होती. लग्न सोहळ्यासाठी तयार होण्यापूर्वी शिवानीने विराजसला एक खास मेसेज केला होता. नुकतंच त्याने त्याबाबतचा खुलासा केला आहे.

Shreya Ghoshal Wedding Anniversary
श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का? गायिकेने लग्नाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने केली खास पोस्ट शेअर, म्हणाली…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
zee marathi lakshmi niwas jahnavi shocked after seen jayant real face
लक्ष्मी निवास : लग्नानंतर दिसलं जयंतचं वेगळंच रुप! ‘ती’ घटना पाहून जान्हवीला बसला धक्का; नेटकरी म्हणाले, “आधीच माहिती होतं…”
Genelia and Riteish Deshmukh 13th Marriage Anniversary
लग्नाला १३ वर्षे पूर्ण होताच जिनिलीया देशमुखने दिली ‘या’ गोष्टीची कबुली! रितेशसह फोटो शेअर करत म्हणाली, “तू एकमेव…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
govinda
“तू स्वत:च तर…”, गोविंदाला गोळी लागल्यानंतर पत्नी सुनीता आहुजाने विचारलेले ‘हे’ प्रश्न; खुलासा करत म्हणाली, “मला भीती…”

“मी सिलेंडरवर बसून होम मिनिस्टरचा तो एपिसोड शूट केला”, आदेश बांदेकरांनी सांगितला किस्सा

विराजसने नुकतंच त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो लग्नादरम्यानचा एक किस्सा सांगताना दिसत आहे. यासोबतच त्या व्हिडीओ लग्नात दोघांच्या एंट्रीपासून ते एकमेकांना हार घालण्यापासून अनेक छोटे छोटे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

यावेळी विराजस म्हणाला, “एकतर माझ्यापासून खूप गूढ काही तरी ठेवण्यात आलं होतं. कारण आम्ही दोघेही ज्या ठिकाणी रेडी होणार होतो, त्या ठिकाणी मी पोहोचण्याच्या पाच मिनिट आधी मला शिवानीचा एक मेसेज आला. आत आलास की रुममध्ये यायचं नाही. तुझी सोय वरती करण्यात आली आहे. त्यामुळे डायरेक्ट वर जायचं. मला बघायचं नाही. त्यावेळी मी म्हटलं हा काय किस्सा आहे.”

“माझ्या मुलाला न्याय द्या”, अमित शाहांच्या भेटीदरम्यान सिद्धू मुसेवालाच्या पालकांना अश्रू अनावर

“त्यानंतर मी आलो आणि तिच्या रुमजवळ जात होतो, तेवढ्यात सर्वजण तू नाही तू नाही करत… तू वर तू वर करायला लागले. यानंतर मला त्यांनी एका कोपऱ्यातील खोलीत तयार होण्यास सांगण्यात आलं. त्यामुळे मला लग्नाच्या दिवशीही शूटींगला आल्यासारखंच वाटत आहे. कपडे बदला, मेकअप करायला बसा, कॅमेरा आहे. त्यामुळे अजूनही मला शूटींगला आल्यासारखं वाटत होतं”, असेही विराजसने म्हटले.

Story img Loader