निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘व्हिक्टोरिया’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी हा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्टलूक समोर आला होता. तर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : श्रेयस तळपदे- मुक्ता बर्वेची केमिस्ट्री आली समोर…‘आपडी थापडी’चा टीझर प्रदर्शित

विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित करून त्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. विराजसने आतापर्यंत अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. पण दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.

‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट येत्या १६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रथमदर्शी हा चित्रपट भयपट असणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग तसेच आशय कुलकर्णी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विराजसच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकार मित्रांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “मी तीन दिवस सलग झोपलो नाही कारण…”, विराजस कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट व्हायरल

‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला होता. या बिग बजेट चित्रपटाचे शूटिंग स्कॉटलंड येथे झाले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virajas kulkarnis first film victorias release date is out rnv