बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. सुहाना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सुहाना एका मिस्ट्री बॉयसोबत दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुहाना परदेशात तिचं शिक्षण पूर्ण करून भारतात परतली आहे. यावेळी सुहानासोबत तिचा एक मित्र देखील आहे. या दोघांचा मन्नत बंगल्या बाहेर कारमध्ये स्पॉट करण्यात आले. त्या दोघांनी फोटोग्राफर्सना पाहिल्यानंतर स्वत: चा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे हा सुहानाचा बॉयफ्रेंड आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. सुहानाचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावलाने शेअर केले आहेत.

आणखी वाचा : “प्रसिद्धी सहन होत नाही, कृपया माझा…”, Viral Video मधील धावणाऱ्या तरुणाची विनंती

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

सुहाना बऱ्याचदा झोया अख्तरच्या ऑफिसच्या बाहेर दिसली होती. सुहाना लवकरच लोकप्रिय कॉमीक बूक आर्चीच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सुहानाचे अनन्या पांडे, शनाया कपूर आणि नव्या नवेली नंदासोबत बऱ्याच वेळा स्पॉट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral social suhana khan spot with mystery man outside at shah rukh khan mannat dcp