दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने कमाईच्या बाबतील अनेक रेकॉर्ड केले आहेत. आता या चित्रपटातून डिलिट केलेला एक सीन प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सीन सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुष्पा’ हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. निर्मात्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्यांनी चित्रपटातील अल्लू अर्जुनचा एक डिलिट केलेला सीन प्रदर्शित केला आहे. विशेष म्हणजे हा सीन हिंदी भाषेत आहे. ही सीन निर्मात्यांनी प्रदर्शित करताच चाहत्यांनी तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘पुष्पा’ हिट होऊनही चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला होतोय ‘हा’ त्रास

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनने एका व्यक्ती कडून उधार पैसे घेतल्याचे दिसत आहे. ती व्यक्ती घरी येऊन गावातल्या लोकांसमोर अल्लू अर्जुनच्या आईला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यानंतर अल्लू अर्जुन त्या व्यक्तीचे व्याजासहित पैसे परत करतो आणि संपूर्ण गावातल्या लोकांच्या घरी जाऊन पैसे परत केल्याचे सांगायला लावते हे दाखवण्यात आले आहे. सध्या चित्रपटातील हा सीन सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. या चित्रपटाने जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video allu arjun film pushpa hindi deleted scene released by makers avb