भारताचा धडाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांना सध्या उधाण येत आहे. या दोघांना अनेकवेळा बरोबर पाहिले गेले असल्याने, यांच्यात काही तरी शिजत असल्याचे कानावर येणे स्वाभावीक आहे. परंतु, आपण दोघे एकमेकांचे केवळ चांगले मित्र असल्याचे विराट आणि अनुष्काचे म्हणणे आहे. पण, अनुष्काला हे कोण समजावणार की चांगले मित्र अनेक दिवस कोणाच्या घरी असेच राहात नाहीत. सुत्रांच्या माहितीनूसार दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यापासून विराट मुंबईतील अनुष्काच्या घरातच राहात आहे.

Story img Loader