भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने थेट ऑस्ट्रेलियातून आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवरुन विराट कोहलीने या शुभेच्छा दिल्या असून त्याने लिहिलं आहे की, ‘सर्वांना थेट ऑस्ट्रेलियातून नववर्षाच्या शुभेच्छा’. आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहलीच पहिलाच होता. नववर्षाच्या शुभेच्छा देताना विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबतचा फोटोही शेअर केला आहे.
विराट कोहली सध्या कसोटी मालिकेमुळे ऑस्ट्रेलियात आहे. यामुळे विराटला भेटण्यासाठी अनुष्का थेट ऑस्ट्रेलियात पोहोचली होती. 11 डिसेंबरला दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. विराट कोहलीसाठी 2018 वर्ष खूपच महत्त्वाचं ठरलं. आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2018 वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा अजून एक विक्रम त्याने आपल्या नावे केला. 69.81 च्या सरासरीने विराट कोहलीने 2653 धावा केल्या. तिसऱ्यांदा त्याने हा पराक्रम केला आहे.
Happy New Year to everyone back home and all over the world, all the way from Australia. Have a wonderful year ahead God bless everyone. pic.twitter.com/ETr48NWbS5
— Virat Kohli (@imVkohli) December 31, 2018
बॉक्सिंग डे सामन्यात पराभव ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विराटने क्रिकेट चाहत्यांना नववर्षाचं गिफ्ट दिलं. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. मेलबर्नमधील कसोटी जिंकत विराटने देशाबाहेर कसोटी सामने जिंकण्याच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. मेलबर्नमध्ये भारताने 37 वर्षानंतर कसोटी सामना जिंकला.
भारत सध्या मजबूत स्थितीत असून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. 3 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना जिंकत एकीकडे भारत इतिहास रचण्याचा प्रयत्न करताना दिसेल तर मालिका ड्रॉ व्हावी यासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.