क्रिकेटच्या मैदानातील अनेकांना नाकीनऊ आणणारी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोदेखील आता आपल्या पत्नीबरोबर म्हणजेच अनुष्कासोबत स्क्रिन शेअर करु शकतो अशी शक्यता दिसून येत आहे. सोशल मीडियावर विराटचं एक पोस्टर प्रदर्शित झालं असून तो कोणत्या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार याविषयी त्याच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात काही तरी वेगळंच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विराटने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला असून या तो अनोख्या रुपात दिसून येत आहे. मात्र हे पोस्टर कोणत्याही चित्रपटाचं किंवा माहितीपटाचं नसून एका अॅड फिल्मचं आहे. या अॅड फिल्मने त्यांचं पोस्टर नुकतचं लॉन्च केलं असून यात विराटची एण्ट्री एखाद्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटासारखी दिसून येत आहे.

‘ट्रेलर’ असं त्याच्या आगामी अॅड फिल्मचं नाव असून विराटच्या टी-शर्टवरही या प्रोडक्शन हाऊसचा लोगो दिसून येत आहे. या फोटोमध्ये विराट एका नव्या अंदाजात दिसत असून यापूर्वी रणवीर सिंह आणि रोहीत शेट्टी यांच्याही अॅड मुव्हीसाठीचं पोस्टर प्रदर्शित झालं  होतं. पण त्यांच्यापेक्षा विराटची चर्चा चांगलीच रंगल्याचं दिसून येत आहे.