अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे कायम त्यांच्या कामबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्यांची लेक वामिकाबरोबर नेहमी वेळ घालवताना दिसतात. नुकतेच न्यू इयर सेलिब्रेशनसाठी ते दुबईला गेले होते. आता विराटने तेव्हा काढलेला एक फॅमिली फोटो शेअर करत खास नोट लिहिली आहे.
विराट कोहलीने एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला. या फोटोत विराट, अनुष्का आणि वामिका समुद्राकाठी एन्जॉय करताना दिसत आहेत. अनुष्का आणि विराट वामिकाचा हात धरून तिला समुद्रकिनारी खेळवत आहेत. हा गोड फोटो पोस्ट करताना त्याने लिहिलं, “देवा माझ्यावर कृपा कर, मी तुझ्याकडे आणखी काही मागत नाही, फक्त तुझे आभार मानतो.” विराट कोहलीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत त्यांचं हे बॉंडिंग आवडल्याचं सांगत आहेत.
आणखी वाचा : Video: “मुंबई पोलीस या लोकांना का पकडत नाहीत?”; सैफ-करीनाच्या बेजबाबदारपणावर नेटकरी संतापले
हेही वाचा : विराट कोहली-अनुष्का शर्माने जुहूमध्ये भाड्याने घेतलं घर; महिन्याला तब्बल ‘इतके’ रुपये मोजणार
विराट आणि अनुष्का काही दिवसांपूर्वीच न्यू इयर सेलिब्रेशन दुबईतकरून भारतात परतले. त्यानंतर ते उत्तराखंडमधील नीम करौली बाबांच्या आश्रमात पोहोचले. तसंच त्यांनी वृंदावन येथील प्रेमानंद गोविंद शरण आश्रमात जाऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळेचा त्यांचा व्हिडीओही सोशल मिडियावर खूप व्हायरल झाला होता.