Virat Kohli Birthday Anushka Sharma:अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एकमेकांबद्दलचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 5 नोव्हेंबरला विराटच्या वाढदिवशीमिसेस कोहली म्हणजेच अनुष्का शर्माने एक सुंदर पोस्ट करून कोहलीचे घरातील खेळकर रूप दाखवले होते. यांनतर अनुष्काने आज आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आणखी एक खास व्हिडीओ पोस्ट केलेला आहे. व्हिडिओमध्ये अनुष्का विराटसाठी सरप्राईज प्लॅन करताना दिसत आहे, मात्र तिची चांगलीच काही फजिती होते. व्हिडिओच्या शेवटी कोहलीला झाडू घेऊन दिसत आहे. चला तर विराट कोहलीच्या वाढदिवसाला असं नेमकं काय घडलं हे पाहुयात..

अनुष्का शर्माने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती रात्री १२ वाजता विराट कोहलीला सरप्राईज देण्यासाठी केक घेऊन येते पण चमचा घेण्यासाठी ड्रॉवर उघडायला जाताच ते जाम झालेले असते आणि ड्रॉवरची कडी खेचताना ती केकसकट जमिनीवर पडते. या आवाजाने कोहलीला जाग येते आणि चोर समजून तो त्याला मारायला झाडू घेऊन किचनमध्ये येतो. खरंतर ही एका ब्रँडसाठी केलेली जाहिरात आहे मात्र यातही विराट – अनुष्काची अगदी गोड केमिस्ट्री दिसून येत आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी

अनुष्का शर्माची फजिती

दरम्यान, विराट कोहलीच्या वाढदिवसाला अनुष्का शर्माने फोटो पोस्ट करून नवऱ्याला शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्येही विराटाचे घरातील तसेच त्याच्या कुटुंबातील खेळकर रूप दिसून येत आहे.

T20 World Cup Finals मध्ये IND vs PAK रंगणार… फक्त येत्या सामन्यात ‘हे’ समीकरण जुळायला हवं

विराट कोहलीला अनुष्का शर्माने दिल्या मजेशीर शुभेच्छा

IND vs ZIM आधी विराटच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन; पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्वीट चर्चेत, पाहा Video

आजचा दिवस विराट कोहलीसाठी अत्यंत खास असणार आहे, टी २० विश्वचषकात भारत विरुद्ध झिम्बाम्बावे सामना आज दुपारी १ वाजता रंगणार आहे. नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात नेदर्लंडच्या विजयाने अगोदरच टीम इंडिया टी २० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे. मात्र विराट कोहलीला आजच्या सामन्यात वैयक्तिक रेकॉर्ड रचण्याची सुवर्णसंधी आहे.

Story img Loader