भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू आणि उपकर्णधार विराट कोहलीने गुरुवारी द. आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला.  त्याच्याचं दुस-या दिवशी विराटने त्याची प्रेयसी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह विजयाचे सेलिब्रेशन केले.
विशेष म्हणजे यावेळी विराट आणि अनुष्का हे एकटेचं नव्हते तर अनुष्काचे वडिल कर्नल अजय कुमार शर्मा हेदेखील त्यांच्यासोबत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या लंच दरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये काही मतभेद झाल्याची माहिती आहे. पण, हॉटेलबाहेर हे प्रेमीयुगुल बाहेर पडल्यावर सर्वकाही कुशमंगल असल्याचे चित्र होते.  यापूर्वीही, लंच, हॉलीडे आणि विमानतळावरची या दोघांची एकत्र छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत.
anusha-virat-lunch-3

Story img Loader