‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी माजी क्रिकटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनी शोमध्ये हजेरी लावली होती. मोहम्मद यांनी पहिल्यांदा शोमध्ये हजेरी लावली आहे. तर, वीरेंद्र सेहवाग यांनी या आधी बऱ्याचवेळा शोमध्य हजेरी लावली आहे.
शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कपिल इंग्रजीबद्दल बोलताना दिसत आहे, पण यावेळी तो स्वत: साठी नाही तर क्रिकेटपटूंविषयी बोलत आहे. कपिलने सेहवागला आठवण करून दिली की एकदा शोमध्ये ते म्हणाले होते की, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि आणखी काही क्रिकेटर्सने लग्न केले जेणेकरून त्यांना चांगली इंग्रजी शिकता येईल.
आणखी वाचा : “आम्ही दोघांनी अजुन लग्न केले नाही…”,सलमान खानने केला त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा
कपिल म्हणाला, ‘वीरु भाई गेल्यावेळी खूप छान उत्तर दित म्हणाले होते की, फक्त मी एकटा नाही तर भज्जी किंवा युवी आम्ही अशा मुलींशी लग्न केले आहे, ज्यांच्यामुळे आमचे इंग्रजी सुधारु शकते.[ यावर सेहवाग म्हणाले, [त्यात कपिल पाजी पण एक आहेत.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी ३’ तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरीकर महाराजावरून वाद
दरम्यान, कपिल देव आणि रूमी देवशी लग्न केले. सेहवागने आरती अहलावत यांच्याशी २००४ मध्ये लग्न केले. हरभजनने गीता बसराशी लग्न केले. तर युवराजने अभिनेत्री हेजल कीचशी लग्न केले.