प्रसिध्द चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज लवकरच छोट्या पडद्यावरील ‘एक थी नायिका’ या मालिकेत अभिनय करतांना दिसणार आहेत. ‘एक थी डायन’ या त्यांच्या अगामी चित्रपटाच्या प्रचाराचा एक भाग म्हणून ते या टिव्ही मालिकेत काम करतांना दिसणार आहेत. या रोमांचक चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि विशाल भारद्वाज यांनी मिळून केली आहे.
एकताने पत्रकारांना सांगितले, “विशाल या मालिकेच्या पहिल्या भागात पाहुणा कलाकाराच्या रूपात दिसणार आहे.” ‘एक थी डायन’ या चित्रपटात इमरान हाश्मी, कोंकणा सेन शर्मा, हुमा कुरैशी आणि कल्की कोचलीन यांच्या मुख्य भुमिका आहेत. विशाल भारद्वाज प्रमाणेच चित्रपटाचे सर्व प्रमुख कलाकार या मालिकेत पाहुणा कलाकाराच्या रूपात दिसणार असून इमरान हाश्मी शेवटच्या भागात दिसणार आहे.

Story img Loader