‘बिग बॉस’ हा शो छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे हे १५ वे पर्व सुरु आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्या एपिसोडपासूनच शोमध्ये काहीना काही होत असल्याचे दिसते. बऱ्याचवेळा शोमधले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या व्हिडीओत एक स्पर्धक शमिता आणि राकेश बापट यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य करतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोग्राने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता एका नेटकऱ्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विशाल कोटियन शमिताच्या जवळच्या लोकांची थट्टा करताना दिसत आहे. या व्हिडीओत तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा आणि विशाल हे अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय ठरलेला ‘दारु आणि लिव्हरचा’ डायलॉग बोलताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत विशाल म्हणतो की शिल्पा शेट्टीच्या बहिणीसोबत रिलेशनशिपमध्ये येऊन राकेश बापटने एक मोठी झेप घेतली आहे. तो म्हणतो, “उसने बडा हाथ मारा है…” दरम्यान, हे सगळे टीव्हीवर बोलणे चुकीचे आहे असे अनेक नेटकऱ्यांना वाटले. तर राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोग्राने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.

रिद्धी तो व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “असे लोक आहेत जे लोकांच्या पाठीमागे त्यांची थट्टा करतात आणि नंतर ही सगळी मस्करी होती असं सांगत स्पष्टीकरण देत बसतात आणि जे सत्य आणि याला एक खेळ समजून खेळतात त्यांच्या भावनेशी खेळतात. प्रेक्षकांना अशी थट्टा आवडेल का? नाही मग सगळ्यात सोप अशा लोकांना शोमधून बाहेर काढा.”

आणखी वाचा : ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्याच्या रिमेकमध्ये कतरिनाला पाहून रवीना म्हणाली…

एवढंच काय तर नेटकऱ्यांनी सलमानला टॅग करत या लोकांना शोमधून बाहेर काढा असा सल्ला दिला आहे. दरम्यान, स्पर्धक विशाल हा शमिताला तिची बहिण बोलतो. एवढंच काय तर ते दोघे एकमेकांना अक्का आणि अण्णा बोलतात.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishal kotian mocks raqesh bapat shamita shetty connection saying bohot bada haath maara dcp