दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा चित्रपट १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३३७.२३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचं कौतुक होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत्या १३ मे रोजी प्रदर्शित होईल. त्यामुळे ज्यांना चित्रपटगृहात हा चित्रपट पाहता आला नाही. त्यांना घरी बसून हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

सई ताम्हणकरची इन्स्टाग्रामवर ‘खास’ पोस्ट, कॅप्शन पाहून चाहते बुचकळ्यात

गेल्या ११ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतात २५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने ३४० रुपयांचा गल्ला जमवला होता. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा बजेट हा १२ कोटी रुपये होता. या चित्रपटाने बजेटच्या २८ पट कमाई केली आहे.

दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र विवेक अग्निहोत्रींनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देत म्हटलं की, त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Video : ‘तारक मेहता…’ मधील दयाबेनचा मिनी स्कर्ट आणि बॅकलेस टॉपमध्ये हटके डान्स, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क

दरम्यान विवेक अग्निहोत्रींनी आता आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ वर काम करायला सुरुवात केली आहे. ‘द दिल्ली फाइल्स’ हा चित्रपट दिल्लीतील गुन्ह्यांच्या सत्य घटनांवर आधारित असणार आहे. काही दिवसांपूर्वीच विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाची माहिती देताना एक ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘सत्य लपवणं, न्याय नाकारणं आणि मानवी जीवनाला महत्त्व न देणं या गोष्टी आपल्या लोकशाहीवर कलंक आहेत. ‘द दिल्ली फाइल्स’मधून सर्वात बोल्ड आणि आपल्या या काळातील एक हृदय पिळवटून टाकणारी कथा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.’

Story img Loader