दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या खूप चर्चेत आहेत. त्यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. विवेक अग्निहोत्री यांनी ‘बुद्धा इन द ट्राफिक जाम’, ‘द ताश्कंद फाईल्स’, ‘हेट स्टोरी’ असे अनेक चित्रपट केले आहेत. ते सध्या त्यांच्या ‘दिल्ली फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये गुंतलेले आहेत.

विवेक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर मत मांडत असतात. ट्विटरचा वापर करुन ते काश्मिरी पंडितांची दयनीय अवस्था लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. विवेक अग्निहोत्री या माध्यमातून बॉलिवूडवर देखील टीका करत असतात. त्यांनी केलेल्या पोस्ट सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. विवेक अग्निहोत्रींनी केलेले असेच एक ट्वीट सध्या खूप व्हायरल झाले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

८ सप्टेंबर रोजी मोदी सरकारने दिल्लीमधील राजपथ मार्गाचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ असे केले. ब्रिटीशांच्या काळात राजपथ रस्त्याला ‘किंग्स वे’ असे म्हटले जात असे. स्वातंत्र्यानंतर या रस्त्याला ‘राजपथ’ असे नाव देण्यात आले. राजपथाच्या नावामागे गुलामगिरीची भावना असल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी रस्त्याचे नाव बदलल्याचा निर्णय सरकारने घेतला. तसेच सरकारद्वारे तेथे सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा देखील बांधण्यात आला. या सर्व प्रकरणावर आपले मत मांडताना विवेक अग्निहोत्रींनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी “नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घेतलेला हा निर्णय जनतेचा दृष्टीकोन बदलणारा आहे. राजपथाला कर्तव्यपथ आणि 7 RCRला लोक कल्याण मार्ग ही नामांतरे केल्यामुळे मला फार आनंद झाला आहे.” असे म्हटले आहे. या ट्वीटला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या ट्वीटला समर्थन दिले आहे, तर काहींनी यावरुन विवेक अग्निहोत्रींवर टीका देखील केली आहे.

आणखी वाचा – रणबीर कपूर नव्हे तर विवेक अग्निहोत्रींनाही आवडतं बीफ? जुना व्हिडीओ व्हायरल

दरम्यान विवेक अग्निहोत्रींचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी गोमांसाबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी ‘मी अगोदरही बीफ (गोमांस) खायचो आणि अजूनही खातो’ असे म्हटले आहे. या व्हिडीओमुळे विवेक अग्निहोत्री पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.

Story img Loader