बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या यशानंतर सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहेत. अनेकदा ते बॉलिवूड दिग्दर्शक आणि कलाकारांवर टीका करताना दिसतात. पण आता त्यांनी एका मुलाखतीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीची खिल्ली उडवली आहे. एवढंच नाही तर त्यांनी या मुलाखतीत निर्माता करण जोहरवरही काही गंभीर आरोप लावले आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सध्या आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. अशात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी या सर्वांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीकाही केली आहे. विवेक अग्निहोत्री अयान मुखर्जीबाबत बोलताना म्हणाले, “अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’ या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? आणि तो अस्त्र पर्वाबद्दल बोलत आहे. ते काय आहे हे सुद्धा त्याला माहीत नसेल.”
आणखी वाचा- “न्यायव्यवस्थेने पुन्हा काश्मिरी पंडितांना…” कोर्टाच्या सुनावणीनंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट व्हायरल

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, “तुम्ही एका अशा दिग्दर्शकाला प्रमोशनसाठी पाठवता ज्याला ‘ब्रह्मास्त्र’ हा शब्दही नीट उच्चारता येत नाही. तो एक चांगला दिग्दर्शक आहे. मी त्याचे ‘वेक अप सीड’ आणि अन्य काही चांगले चित्रपट पाहिले आहेत जे मला खूप आवडले. पण यावेळी मी आशा करतो की त्याने या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून योग्य न्याय दिला असेल. जशी एका आईला आपल्या बाळाची काळजी वाटते तशीच मला त्याची काळजी वाटतेय.”

आणखी वाचा- Video : पुण्यातील भीषण हत्याकांडावर आधारित ‘जक्कल’चा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित

याशिवाय विवेक अग्निहोत्री यांनी या मुलाखतीदरम्यान निर्माता करण जोहरवर गंभीर आरोप केले आहेत. करण जोहरबद्दल बोलताना ते म्हणाले, “तो LGBTQ समुदायाबद्दल बोलतो. मात्र तो या समुदायाची खिल्ली उडवत असतो. मला हे समजत नाही की करणचे चित्रपट LGBTQ समुदायाची खिल्ली का उडवतात? आणि मग तो त्यांच्या सक्रियतेबद्दल बोलतो. त्यांना न्याय मिळावा यासाठी बोलतो. पण त्यासाठी काही करताना दिसत नाही.”

Story img Loader