अभिनेता रणबीर कपूरसह आलिया भट्ट आणि चित्रपट निर्माता अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. एकीकडे चित्रपटाला जोरदार पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे बॉयकॉट ‘ब्रह्मास्त्र’ ट्रेंड होताना दिसत आहे. रणबीर कपूरचे गोमांसबाबतचे जुने विधानही चर्चेत आले होते, ज्यामुळे त्याला अलिकडेच उज्जैनमध्ये महाकालेश्वरचे दर्शनही करता आले नव्हते. आता विवेक अग्निहोत्री यांचा एक जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्यांना बीफ म्हणजे गोमांस आवडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे विवेक अग्निहोत्री यांनी काही दिवसांपूर्वीच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती.

एका जुन्या मुलाखतीतील विवेक अग्निहोत्रींचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विवेक म्हणतायत, “मी हेही लिहिले आहे की तुम्हाला उत्तम बीफ कुठे मिळेल, मी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत, मी अगोदरही बीफ खायचो आणि अजूनही खातो. माझ्या आयुष्यात काहीही बदलले नाही.” विवेक अग्निहोत्री यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आणखी वाचा-Viral Video: बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडवला रणबीर, आलियाचा रस्ता; बीफसंदर्भातील विधानामुळे महाकाल मंदिराबाहेर गोंधळ

दरम्यान अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी या सर्वांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीकाही केली होती. विवेक अग्निहोत्री अयान मुखर्जीबाबत बोलताना म्हणाले, “अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’ या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? आणि तो अस्त्र पर्वाबद्दल बोलत आहे. ते काय आहे हे सुद्धा त्याला माहीत नसेल. तुम्ही एका अशा दिग्दर्शकाला प्रमोशनसाठी पाठवता ज्याला ‘ब्रह्मास्त्र’ हा शब्दही नीट उच्चारता येत नाही. तो एक चांगला दिग्दर्शक आहे. मी त्याचे ‘वेक अप सीड’ आणि अन्य काही चांगले चित्रपट पाहिले आहेत जे मला खूप आवडले. पण यावेळी मी आशा करतो की त्याने या चित्रपटाला दिग्दर्शक म्हणून योग्य न्याय दिला असेल. जशी एका आईला आपल्या बाळाची काळजी वाटते तशीच मला त्याची काळजी वाटतेय.”

आणखी वाचा-“आलिया रणबीरला महाकालेश्वराचं दर्शन…” ‘ब्रह्मास्त्र’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया चर्चेत

रणबीरच्या वक्तव्याबद्दल बोलायचं तर २०११ मध्ये रणबरीने रॉकस्टार चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आपल्याला बीफ खायला आवडतं असं म्हटलं होतं. “माझं कुटुंब पेशावरचं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पेशावरी खाद्यसंस्कृतीही इथे आली आहे. मी मटण, पायाही खातो. मी बीफचा चाहता आहे. ” असं रणबीर म्हणाला होता. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

Story img Loader