बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या न्यूड फोटोशूटमुळे सतत चर्चेत आहे. रणवीरनं ‘पेपर’ या मासिकासाठी काही दिवसांपूर्वीच न्यूड फोटोशूट केलं. त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची बरीच चर्चा झाली. रणवीर टीका करण्यात आली, एवढंच नाही तर मुंबईतील एका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. यावर आता बॉलिवूड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहे. या फोटोशूटमुळे रणवीरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वरा भास्कर यावर कमेंट केली आहे. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील यावर भाष्य केलं आहे.
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “असा गुन्हा दाखल करणं म्हणजे मूर्खपणा होता. कोणतही कारण नसताना या गोष्टीवर वाद घातला जात आहे. हे प्रकरण वाढवलं जात आहे. तक्रारीमध्ये महिलांच्या भावना दुखवल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता मला सांगा जेव्हा महिलांचे बोल्ड फोटो समोर येतात, तेव्हा पुरुषांच्या भावना दुखावल्या जातात का? हे तर्क एक मूर्खपणा आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मानवी शरीराचं नेहमीच कौतुक केलं गेलं आहे. आपलं शरीर म्हणजे देवानं दिलेली देणगी आहे. त्याची सुंदर रचना आहे. मला हे अजिबात आवडलेलं नाही.”
आणखी वाचा- तब्बल तीन तास कपड्यांशिवाय होता रणवीर, फोटोग्राफरनं सांगितलं कसं झालं शूटिंग
विवेक अग्निहोत्रींच्या अगोदर स्वरा भास्करनं देखील यावर भाष्य केलं होतं. स्वरा भास्करने ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली होती. यात तिने एका ट्वीटला रिट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटला रिट्वीट करत स्वरा भास्कर म्हणाली, “अविश्वसनीय मूर्खपणा आणि बेरोजगारी सध्या आपल्या देशात पसरली आहे.”
दरम्यान रणवीर सिंगने हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी करण्यात आलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये रणवीरच्या अंगावर एकही कपडा दिसत नाही. यावेळी रणवीरने बोल्ड पोजही दिली आहे. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले आहेत. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसत आहे. यानंतर रणवीर सिंग हा अडचणीत सापडला आहे.