बॉलिवूड हे असं क्षेत्र आहे जिथे अफवांचा बाजार नेहमीच असतो. अशा अनेक गोष्टी इथे पसरल्या आहेत, ज्यांचा सत्याशी काहीही संबंध नाही. रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमामुळे पीव्हीआरला ८०० कोटी रुपयांचं झाल्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. एकीकडे चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे या वृत्तामुळे आलिया- रणबीरचा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र आता या वृत्तावर प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करून बॉलिवूडची खरी बाजू मांडली आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तसेच रणबीरचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. मात्र, ‘ब्रह्मास्त्र’मुळे पीव्हीआर आणि गुंतवणूकदारांचं ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा बिझनेस इनसाइडरच्या अहवालात करण्यात आला आहे. या वृत्तावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा- जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
विवेक अग्निहोत्री ही अफवा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “समस्या ही आहे की बॉलिवूडमध्ये भरपूर कृत्रिमता आहे. चुकीच्या गोष्टी फार लवकर पसरतात आणि त्यासाठी कोणीही जबाबदार नसते. असे कोणतेही क्षेत्र नाही जे संशोधन आणि विकासावर शून्य टक्के गुंतवणूक करते आणि ७० ते ८० टक्के फक्त कलाकारांवर वाया घालवत असेल.”
आणखी वाचा- Video : ‘काय करतोस…?’ चाहत्याची ‘ती’ कृती पाहून हृतिक रोशन संतापला
‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ‘शिवा’ रिलीज झाला आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा पहिलाच चित्रपट आहे ज्यात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र दिसले आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन ३६ कोटींच्या जवळपास आहे.