रणबीर कपूरचे गोमांसबाबतचे जुने विधानही चर्चेत आले होते, ज्यामुळे त्याला अलिकडेच उज्जैनमध्ये महाकालेश्वरचे दर्शनही करता आले नव्हते. आता विवेक अग्निहोत्री यांचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्यांना बीफ म्हणजे गोमांस आवडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं. या प्रकरणावर दिग्दर्शकाने स्पष्टीकरण दिले होते, मात्र आता त्यांनी ट्विट करून करण जोहरवर निशाणा साधला आहे आणि कॉफी क्लबच्या लोकांना सल्ला दिला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून लिहिले की, ‘मला वाटते की कॉफी क्लबच्या खोडकर मुलांनी त्यांच्या एसएम एजन्सी आणि पीआर कंपन्यांना माझ्याशी भांडण्याऐवजी त्यांच्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले पाहिजे. मी अशा प्रकारचा नाही ज्याला तुम्ही फ्री हॅम्पर्सचे आमिष दाखवून तोडू शकता’. विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. काही त्याचे समर्थन करत आहेत, तर काही त्याचे बीफचे व्हिडिओ शेअर करत आहेत.

Video : रणबीर कपूर नव्हे तर विवेक अग्निहोत्रींनाही आवडतं बीफ? जुना व्हिडीओ व्हायरल

विवेक अग्निहोत्री यांच्या बीफ प्रकरणावर त्यांनी असे स्पष्टीकरण दिले होते की, एक काळ असा होता की मी मांस खात असे की ते आरोग्यासाठी चांगले असायचे मात्र आता मी सात्विक आणि शाकाहारी झालो हळूहळू माझी तब्येतही बरी होत गेली. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवुडमध्ये ते चांगलेच सक्रिय झाले आहेत. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून त्यांचे कौतुक देखील करण्यात आले होते तसेच त्यांच्यावर टीका देखील झाली होती.

दरम्यान अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी या सर्वांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीकाही केली होती. विवेक अग्निहोत्री अयान मुखर्जीबाबत बोलताना म्हणाले, “अयान मुखर्जीला ‘ब्रह्मास्त्र’ या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? आणि तो अस्त्र पर्वाबद्दल बोलत आहे. ते काय आहे हे सुद्धा त्याला माहीत नसेल. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर टीका करत आहेत. ‘दिल्ली फाईल्स’ या आगामी चित्रपटावर ते आहेत.

Story img Loader