वेब सीरिजच्या विश्वातली लोकप्रिय सीरिज म्हणजे ‘असुर’. ही एक थरारक वेब सीरिज आहे. या मालिकेत अभिनेता अर्शद वारसी, बरुण सोबती, अमेय वाघ, आणि अभिनेत्री अनुपरिया गोयंका प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. ‘असुर’ ही एक रोमांचक सस्पेन्सबेस सीरिज असून यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या भागाच्या यशानंतर प्रेक्षक आता दुसऱ्या सीजन आतुरतेने वाट बघत आहेत. आता ‘असुर’च्या चाहात्यांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच या सीरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेब सीरिजचे पहिला सीजन अतिशय रोमांचक वळणावर संपवला होता. या वेब सीरिजने प्रेक्षकांना एका वेगळ्या कोड्यात टाकलं होतं. नक्की असुर आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांन पडला होता. अर्शद वारसी, बरुण सोबती की  अमेय वाघ ?. हे कोडं आता लवकरचं सुटणार आहे.

‘असुर २’चं शूटिंग खूप काळापासून रखडलेलं होतं. करोना महामारीमुळे याच्या चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता अखेर या सीरिजचं शूटिंग सुरू झालं आहे. अनुपरिया गोयंकाने शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितलं की,”या सीरिजचा चित्रीकरणांचा अनुभव उत्तम होता. झूम कॉलपेक्षा प्रत्यक्ष जाऊन भेटणं खूप हे वेगळं आहे. मला आनंद आहे की, दिग्गज लोकांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली आहे.” तसंच दुसरा सीजन सुद्धा प्रेक्षकांना नक्की आवडेल असेही तिने या मुलाखतीत सांगितले.

‘असुर’चा पहिले सीजन तूफान गाजलेल होतं. ही वेब सीरिज तुम्हाला वूटवर बघायला मिळेल. त्याबरोबरच ही वेब सीरिज  लवकरंच नेटफ्लिक्सवर रीलीज होणार असल्याची ही चर्चा रंगत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voot special asur 2 shooting begans actress anupriya goenka says meeting people personally is different aad