अभिनेता-निर्माता रितेश देशमुखचे जून आणि जुलै मिळून तब्बल तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हमशकल्स, एक व्हिलन आणि लय भारी- तीन चित्रपट चार आठवडे.. टाइम स्टार्टस नाउ, असे रितेशने ट्विट केले आहे. चार आठवड्यांत प्रदर्शित होणा-या या तिनही चित्रपटांत रितेशचे वेगवेगळे रुप पाहावयास मिळणार आहे.
कॉमेडी (हमशकल्स), अॅक्शन (लय भारी), खलनायक (एक व्हिलन) यापैकी तुम्हाला त्याचे कोणते रुप आवडले ते तुम्ही पुढील पोलमध्ये नोंदवू शकता. हमशकल्स हा चित्रपट आज (२० जून) प्रदर्शित झाला असून, एक व्हिलन २७ जून तर मराठी चित्रपट लय भारी हा ११ जुलैला प्रदर्शित होत आहे.

Story img Loader