सशक्त आणि अगदी बांधेसूद पटकथा, चांगले प्रॉडक्शन हाऊस या दोन गोष्टी भूमिकेएवढय़ाच महत्त्वाच्या असतात. कौटुंबिक जबाबदारी आणि देवगण फि ल्म प्रॉडक्शनचा व्याप सांभाळण्यात व्यस्त असलेली काजोल सध्या अशाच एका चांगल्या पटकथेच्या शोधात आहे.
विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या काजोलने २००६ मध्ये आमिर खानबरोबर ‘फना’ चित्रपट केला. त्यानंतर पुन्हा चार वर्षांनी म्हणजे २०१० मध्ये तिने करण जोहरच्या ‘वुई आर फॅमिली’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्यानंतर मात्र काजोलने जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले पण, चित्रपटात येणे तिने कटाक्षाने टाळले. चांगल्या पटकथा नसल्याचे कारण पुढे करीत तिने चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले. चित्रपट नसले तरी दोन्ही मुलांचे संगोपन हे माझे पूर्णवेळ काम आहे आणि या कामाचा क्षण न् क्षण मला आनंद, समाधान देऊन जातो, असे काजोलने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waiting for right script says kajol