तुम्ही बॉलीवूड सुपरस्टार हृतिकचे चाहते आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हृतिकसोबत मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. ‘डर के आगे जीत है’ या शीर्षकाशी मिळतेजुळते जीवन जगणा-या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. याकरिता माउंटन ड्यू या शीतपेय कंपनीने हृतिकच्या ‘बँग बँग’ चित्रपटाच्या सहयोगाने एक मोहिम सुरु केली आहे.
या मोहिमेत तीन विजेते निवडण्यात येणार असून, त्यांना हृतिकसोबत लघुपटात काम करण्याची संधी मिळणार आहे. याबाबत बोलताना हृतिक म्हणाला की, सर्वसामान्यातून हिरो बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या आजच्या तरुण पिढीसोबत काम करण्याची मला संधी मिळत आहे. प्रत्येकात एक हिरो असतो, त्याकरिता आपल्यात काही विशेष शक्ती असण्याची गरज नसते. आपल्या मनातील भीती दूर करून जे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जातात ते माझ्यासाठी हिरो आहेत. माउंटन ड्यूच्या या मोहिमेत सहभागी होण्याकरिता सदर शीतपेयाच्या बाटलीवर छापलेला कोड एसएमएस करावयाचा आहे.

Story img Loader