‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील प्रमुख रोमॅंटिक जोडी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण उद्या (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता एक्स्प्रेस समुहाच्या कार्यालयात येणार असून स्क्रीन साप्ताहिकाच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधणार आहेत.
जर तुम्हाला सुद्धा या जोडीला काही प्रश्न विचारायचे असतील, तर या पानावरील प्रतिक्रियेच्या सुविधेचा वापर करून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पाठवा. रणबीर आणि दीपिका या जोडीने ‘बचना ए हसिनो’ चित्रपटामध्ये काम केले होते. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या म्हणण्यानुसार दोघांनीही ‘ये जवानी है दिवानी’मध्ये काम करण्याच्या खूप अगोदर परस्परांमधील मतभेद मिटवले होते. या चित्रपटाद्वारे ते दुस-यांदा एकत्र येत आहेत.
३१ मे रोजी प्रदर्शित होणा-या या रोमॅन्टीक चित्रपटाचा निर्माता करण जोहर असून, यात आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन यांचा सुद्धा अभिनय आहे.
काही निवडक प्रश्न आम्ही रणबीर आणि दिपीकाला विचारू.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2013 रोजी प्रकाशित
विचारा प्रश्न दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरला
'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील प्रमुख रोमॅंटिक जोडी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण उद्या (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता एक्स्प्रेस समुहाच्या कार्यालयात येणार असून स्क्रीन साप्ताहिकाच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधणार आहेत.
First published on: 13-05-2013 at 05:58 IST
TOPICSकरण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodरणबीर कपूरRanbir Kapoorहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to ask yeh jawaani hai deewani couple ranbir kapoor deepika padukone a question post it now