‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील प्रमुख रोमॅंटिक जोडी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण उद्या (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता एक्स्प्रेस समुहाच्या कार्यालयात येणार असून स्क्रीन साप्ताहिकाच्या संपादकीय मंडळाशी संवाद साधणार आहेत.
जर तुम्हाला सुद्धा या जोडीला काही प्रश्न विचारायचे असतील, तर या पानावरील प्रतिक्रियेच्या सुविधेचा वापर करून तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पाठवा. रणबीर आणि दीपिका या जोडीने ‘बचना ए हसिनो’ चित्रपटामध्ये काम केले होते. दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या म्हणण्यानुसार दोघांनीही ‘ये जवानी है दिवानी’मध्ये काम करण्याच्या खूप अगोदर परस्परांमधील मतभेद मिटवले होते. या चित्रपटाद्वारे ते दुस-यांदा एकत्र येत आहेत.
३१ मे रोजी प्रदर्शित होणा-या या रोमॅन्टीक चित्रपटाचा निर्माता करण जोहर असून, यात आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलीन यांचा सुद्धा अभिनय आहे.
काही निवडक प्रश्न आम्ही रणबीर आणि दिपीकाला विचारू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा