पडद्यावर सतत सकारात्मक भूमिकांमधून दिसणारया ‘तू तू मै मै’ फेम सुप्रिया पिळगावकरला त्याच-त्याच भूमिकांचा कंटाळा आला आहे. तिला आपल्या भोवतीचे हे वलय पुसून प्रयोगात्मक वेगळ्या पठडीतील भूमिका करायच्या आहेत.
गेल्या एक दशकापासून चित्रपटसृष्टीत असलेल्या ४५ वर्षीय अभिनेत्रीने आपल्या करीयरची सुरूवात १९९६ ला एका सूनेच्या भूमिकेपासून केली. आता ब-याच वर्षांनी ती आई व सासूच्या भूमिकांमध्ये दिसत आहे.
“भूमिकांमध्ये बदल होणे आवश्यक होते. मात्र, आहे ते काम सोडून घरी बसणेही योग्य नव्हते. मला नकारात्मक भूमिका करायला आवडेल, पण कोणीही माझ्या आजपर्यंतच्या भूमिकांमुळे त्यासाठी माझा विचार करत नाही. यातून बाहेर पडणे खूप अवघड आहे.”, असे सुप्रिया म्हणाली.
आहे त्या भूमिकांमध्येच थोडाफार प्रयोग करून वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तेच मोठे आवाहन असल्याचे सुप्रियाला वाटते. स्टार प्लसवरील टीव्ही शो ‘मेरी भाभी’मधून सुप्रिया पुन्हा वेगळ्या सासूच्या भूमिकेत दिसणार आहे.      

Story img Loader