सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी त्याने आपल्या शरीरयष्टीतही बराच बदल केला आहे. त्यामुळे सध्या सलमानला कपड्यांबाबत फारचं काळजी घ्यावी लागतेय. याच कारणामुळे नुकतीच सलमानची पंचाईत झालेली पाहावयास मिळाली.
गेल्याच आठवड्यात टोयफा पुरस्कार सोहळा रंगला. सलमानचे मंचावर आगमन होताच त्याच्या चाहत्यांनी बराच कल्ला केला. आपल्या चाहत्यांना हात दाखवत सलमानही हसत होता. सर्वांना वाटत होते की सलमान आनंदात आहे. पण सत्य काही वेगळेचं होते. सलमान त्यावेळी खूप रागवलेला होता. झाले असे की, सलमानला देण्यात आलेले कपडे हे त्याला घट्ट झाले होते. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. सुलतानसाठी शरीरयष्टीत बदल केल्यानंतर सलमानला नवीन कपड्यांची गरज पडत आहे. मात्र, पुरस्कारासाठी सलमानकरिता त्याच्या जुन्या शरीरयष्टीप्रमाणे कपडे शिवण्यात आले होते. त्यामुळे ऐनवेळी सलमानची पंचाईत झाली. त्याच कपड्यांमध्ये काही बदल करणे किंवा नवीन कपडे शिवणे शक्य नसल्याने त्याला तेच कपडे घालावे लागले. स्पॉटबॉयईच्या वृत्तानुसार पुरस्कारानंतर सलमानने डिझाइनरची कानउघडणी केल्याचे कळते.
‘सुलतान’साठी शरीरयष्टीत बदल केल्यानंतर डिसेंबर महिन्यात काढलेला सलमानचा फोटो.