गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्री जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडच्या समर्थनार्थ आपलं मत वक्तव्य केले होतं, परंतु त्यानंतर मात्र, जया बच्चन जोरदार ट्रोल होऊ लागल्या. अशाच एका वादात बच्चन कुटुंब आधी अडकलं होतं. अमिताभ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो फोटो आता पुन्हा एकदा व्हारल झाला आहे. त्याच स्पष्टीकरण हे अभिषेकने २०२०मध्येच दिलं होतं.

अमिताभ बच्चन यांचा या व्हायरल झालेल्या फोटोत ते एका व्यक्तीसोबत हात मिळवताना दिसत आहेत. ती व्यक्ती दाऊद इब्राहिम आहे असे अनेक लोक बोलत होते. खरतरं हा फोटो २०२० मध्ये ही व्हायरल झाला होता. त्यावर अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले होते. “भाऊ, हा फोटो माझे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण आहेत”, असे ट्वीट अमिताभ यांनी केले आहे.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

आणखी वाचा : ऐश्वर्याची लेक आराध्यासोबत ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात धीरुभाई अंबानी शाळेत, पाहा फोटो

आणखी वाचा : दयाबेन प्रेग्नेंट? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरुन चर्चा

अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती १३’ या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. तर अभिषेक बच्चनचा ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेषकांच्या पसंतीस उतरला आहे.

Story img Loader