सध्या ‘राम लीला’ चित्रपटाने यशाच्या शिखरावर असलेल्या रणवीर सिंगच्या ‘गुंडे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रणवीर, अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा यांची ‘गुंडे’ चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
ट्रेलरमध्ये कोळसा माफिया, बंदुका, आणि सुंदर बंगाल पाहावयास मिळतो. चित्रपटातील मुख्य पात्र बिक्रम (रणवीर) आणि बाला (अर्जुन) यांची ओळख करून देण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफान खानने आवाज दिला आहे. लहानपणापासून अपराध करणारे हे दोघे मोठे होऊन कोळसा माफिया बनतात, यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. मात्र, ट्रेलरमध्ये प्रियांकाची झलक पाहावयास मिळत नाही.

Story img Loader