ऐश्वर्या राय बच्चन ही जगातील सर्वाधिक सुंदर महिलांमधील एक आहे, याबाबत काहीच शंका नाही. माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही माध्यमांच्या चर्चेत आहे. मात्र, कान चित्रपट महोत्सवातील सोनेरी रंगाच्या गाऊनमधल्या रुपाने सर्वांचीच तोंड बंद करून टाकली आहेत.
या सुंदरीने रॉबर्टो कॅवेली फिशटेल गाउन परिधान केला होता. त्यात ओठांवर गडद लाल रंगाची लिपस्टिक आणि नखांच्या रंगाने आणखीनच ती खुलून दिसत होती. कान महोत्सवातील हे तिचे १३वे वर्ष आहे.
पाहाः कान महोत्सवातील आपल्या लूकबाबत काय म्हणाली ऐश्वर्या राय बच्चन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा