अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाच्या ‘हॉलीडेः अ सोल्जर इज नेव्हर ऑफ डयुटी’ या चित्रपटातील ‘ब्लेम द नाइट’ हे तिसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे एक पार्टीयुक्त गीत आहे.
चित्रपटात कॅप्टन विराटची भूमिका साकारणारा अक्षय कुमार गाण्यात काही छान डान्स मूव्ह्ज करताना दिसतो. या गाण्यास संगीत प्रितमने दिले असून अरिजीत सिंग आणि अदिती शर्माने यास गायले आहे. हॉलीडे या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शक ए.आर.मुरुगदोस यांचे आहे. आमिरच्या सुपरहिट ‘गजिनी’ चित्रपटामागेही त्यांचाच हात होता. तमिल चित्रपट ‘थुप्पक्की’ चा रिमेक असलेल्या ‘हॉलीडे’ चित्रपटात गोविंदा सहायक कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. हा चित्रपट ६ जूनला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा