बहुचर्चित ‘२ स्टेट्स’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चेतन भगतच्या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.
‘२ स्टेट्स’ ची कथा पंजाबी मुलगा क्रीश आणि तमिलीयन ब्राम्हीण मुलगी अनन्या यांच्या प्रेमाची आहे. हे दोघे कॉलेजमध्ये भेटतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. पुढे दोघेजण लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि त्यांच्या पालकांदरम्यान असलेली उत्तर दक्षिणेची दरी भरून काढण्याचे काम त्यांना लागते. पहिल्यांदाच आलिया भट आणि अर्जुन कपूर एकत्र रुपेरी पडद्यावर काम करत आहेत. चित्रपटात त्यांनी काही चुंबन दृश्ये तर दिलीच आहेत पण यात दोघांमध्ये प्रणयदृश्येही चित्रीत करण्यात आली आहेत. सैफ अली खानची पहिली पत्नी अम्रिता सिंगने क्रिशच्या पंजाबी आईची भूमिका केली असून, रॉनित रॉय त्याच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. आलियाच्या आईची भूमिका दिग्दर्शक आणि अभिनेत्री रेवतीने केली आहे.
अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा