अमिताभ बच्चन, विद्या बालन, अनिल कपूर या प्रतिभावान कलाकारांचा आवाज असलेल्या अॅनिमेटेड ‘महाभारत’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे बॉलीवूड कलाकारांचे नुसते आवाजच नाहीत तर त्यांचे चेहरेही चित्रपटातील अॅनिमेटेड पात्रांना देण्यात आले आहे.
पितामह भीष्मच्या पात्रासाठी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. जॅकी श्रॉफ हे दुर्योधन, अनुपम खेर हे शकुनी मामा तर द्रौपदी या पात्रांसाठी विद्या बालन हिने आवाज दिला आहे. याव्यतिरीक्त अनिल कपूरने कर्ण, अजय देवगणने अर्जुन आणि मनोज वाजपेयीने युधिष्ठीरसाठी आवाज दिला आहे.
या चित्रपटातील एक महत्वाचे पात्र म्हणजे कृष्ण. त्याकरिता निर्मात्यांनी सलमानला चित्रपटात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, सलमानने अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. अॅनिमेटेड ‘महाभारत’ चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader