बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन अनुराग कश्यपच्या ‘युद्ध’ या काल्पनिक मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’चे नवे पर्वही लवकरच सुरू होणार आहे. मात्र, यावेळेस बीग बी पूर्णपणे नव्या रुपात छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये अमिताभ हे युद्धिष्ठिर नावाच्या उद्योजकाच्या भूमिकेत दिसतात. अमिताभ यांच्याबरोबर के. के. मेनन, नवाजुद्दिन सिद्दीकी आणि अभिनेत्री सारिका यांच्या या मालिकेत महत्वाच्या भूमिका आहेत. कॉर्पोरेट विश्वातील उद्योजक म्हणून असलेली लढाई आणि त्याचवेळी वैयक्ति आयुष्य जपण्यासाठीची लढाई लढणा-या उद्योजकाची भूमिका अमिताभ यांनी साकारली आहे. बॉलीवूडची पावले आता हळूहळू छोट्या पडद्यावरील मालिकांकडे वळू लागली आहेत असे म्हणावयास हवे. अनिल कपूरच्या ‘२४’ या क्राइम थ्रिलर मालिकेनंतर आता अमिताभ युद्धसाठी सज्ज झाले आहेत. या मालिके चे दिग्दर्शन अनुराग कश्यपचे आहेच. पण, मालिका म्हणून काही भाग हे ‘मद्रास कॅफे’ फे म शुजित सिरकारने दिग्दर्शित केले आहेत. अमिताभ यांच्या व्यक्तिरेखेच्या नावावरून ‘युद्ध’ असे नाव ठेवण्यात आलेली ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. नुकताच या मालिकेचा फर्स्ट लूक आयपीएल अंतिम सामन्यादरम्यान लाँच करण्यात आला.