सुभाष घई यांच्या ‘राम लखन’ चित्रपटातील अनिल कपूर यांचा टपोरी डान्स आजही तितकाचं प्रसिद्ध आहे. यंदाच्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल’मध्ये अनिल यांच्या याच नृत्याची जादू पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहावयास मिळाली.
शुक्रवारी ४६ वा ‘इफ्फी’ पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनिल यांनी ‘माय नेम इज लखन’ या गाण्यावर ठेका धरला. ज्यावेळी ‘राम लखन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा प्रत्येकजण अनिल कपूरच्या या डान्स स्टाइलची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न करायचे. आजही त्यांचा ही डान्स स्टाइल ‘टपोरी डान्स’ म्हणून ओळखली जाते. सध्या अनिल कपूर त्यांच्या ‘२४’ या मालिकेच्या कामात व्यस्त आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch anil kapoor does the iconic tapori dance from ram lakhan at iffi