‘पीके’चे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यावर चित्रीत आले असून ‘चार कदम’ असे त्याचे बोल आहेत.
‘चार कदम’ गाण्यात चित्रपटातील मुख्य कलाकार अनुष्का आणि सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री दिसून येते. श्रेया घोषाल आणि शान यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.
यापूर्वी ‘ठरकी छोकरो’ आणि ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम’ ही दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली होती. आमिर, अनुष्का आणि सुशांतशिवाय संजय दत्त, बोमन इराणी आणि सौरभ शुक्लासुध्दा महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विधु विनोद चोप्रा, सिध्दार्थ रॉय कपूर आणि राजकुमार हिराणीच्या प्रॉडक्शनखाली हा सिनेमा तयार केला जात आहे. 19 डिसेंबर रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होत आहे.

Story img Loader