बॉलीवूड कलाकार त्यांची भूमिका अधिकाधिक चांगली होण्यासाठी विशेष काळजी घेताना सध्या दिसतात. चित्रपटांसाठी झिरो साइज फिगर, सिक्स पॅक अॅब्ज किंवा लूक बदलायला ते मागेपुढे पाहत नाहीत. आगामी ‘पीके’ चित्रपटासाठी अनुष्कानेही तिच्या लूकमध्ये बदल केला. ‘पीके’साठी अनुष्काची जगत जननी कशी झाली हे दाखविणारा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘पीके’मध्ये अनुष्काला छोटे केस असलेला लूक देण्यात आला आहे. सदर व्हिडिओत अनुष्का तिच्या लूकबद्दल सांगताना दिसते. जगत जननी म्हणजेच जग्गू या भूमिकेसाठी योग्य लूककरिता तिने वेगवेगळया लूकची चाचणी दिल्याचे यात दाखविण्यात आले आहे. आमिर खान, सुशांत सिंग राजपूत, अनुष्का शर्मा, बूमन ईराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असलेला राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’ १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader