‘2 स्टेट्स’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील ‘ओफ्फो!’ या गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे. चित्रपटातील गाण्याचा हा पहिलाच व्हिडिओ चित्रपटकर्त्यांकडून प्रसिध्द करण्यात आला आहे. चित्रपटातील प्रमुख जोडी आलिया भट आणि अर्जुन कपूरवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. गाण्यात त्यांच्यामधील प्रेमाचा विविध पातळ्यांवरचा प्रवास पहायला मिळतो. चित्रपटात आलिया भट अनयाची तर अर्जुन कपूर क्रिशची भूमिका साकारात आहेत. गाण्यात या दोघांमधील काही प्रेमदृष्येदेखील चित्रीत करण्यात आली आहेत. शंकर, एहसान आणि लॉयचे संगीत असलेल्या या गाण्याला अदिती सिंग आणि अमिताभ भट्टाचार्यने गायले आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित ‘२ स्टेट्स’ चित्रपटात अनया आणि क्रिश या प्रेमियुगलाच्या कुटुंबियांची उत्तर-दक्षिण भारतीय खट्टी-मिठी नोकझोक पाहायला मिळेल. धर्मा प्रॉडक्शनचा हा चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ: