आगामी रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट ‘2 स्टेट्स’ या बहुप्रतिक्षित चित्रपटातील ‘इसकी उसकी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे. शाहीद माल्या आणि आकृती काकरने गायलेले हे गाणे पंजाबी पॉप गीत आहे.

‘इसकी उसकी’ हे गाणे चाहत्यांना त्याच्या संगीतावर थिरकायला लावते. हे गाणे अऩाया (आलिया भट) आणि क्रीश (अर्जुन कपूर) यांच्यावर चित्रीत करण्यात आले असून, रंगीबेरंगी भारतीय पोशाखात ते यात नृत्य करताना दिसतात. ‘2 स्टेट्स’ हा चित्रपट चेतन भगतच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. क्रीश हा पंजाबी मुलगा अनाया नावाच्या दाक्षिणात्य मुलीच्या प्रेमात पडतो, यावर चित्रपटाची कथा आहे. यात अमृता सिंग, रॉनित रॉय आणि रेवती यांच्याही भूमिका आहेत. अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘2 स्टेट्स’ हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

 

Story img Loader