‘२ स्टेट्स’च्या निर्मात्यांनी चित्रपटातील ‘लोचा-ए-उलफत’ हे गाणे प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि आलिया भट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटात हॉट कॉलेज मुलीच्या भूमिकेत आलिया मिरवत असताना अर्जुनने लोचा-ए-उलफत या गाण्यातून आपली जादू चालवली आहे. दिग्गज अभिनेता शशी कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत काही डान्स मूव्हज सदर गाण्यात अर्जुनने केल्याचे म्हटले जात आहे. या गाण्यास शंकर, एहसान आणि लॉय यांनी संगीत दिले असून, अदिती सिंग शर्मा आणि अमिताभ भट्टाचार्यने त्यास गायले आहे.
पंजाबी मुलगा आणि दाक्षिणात्य मुलगी यांच्या प्रेमावर चित्रपटाची कथा आधारित आहे. अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘२ स्टेट्स’ १८ एप्रिलला प्रदर्शित होईल.

Story img Loader